आमच्याबद्दल
मानव-बिबट संघर्ष
मानव-बिबट संघर्ष टोकाला गेलाय. मानवी वस्तीत बिबट येऊन हल्ले करतोय. पशुधनावर वारंवार हल्ले होत आहेत. लोकांच्या जिवाला धोका आहे. बिबट संख्येत झपाट्याने वाढ होण्याचा इशारा आहे. बिबट्याचा उसात शेतात वाढता अधिवास.
लढा का?
वाढत्या बिबट संख्येचे नियत्रण करण्यासाठी उपाय राबविण्यासाठी. केंद्रीय आणि राज्य सरकारांनी कायदा सुधारावा आणि ठोस कारवाई करावी. बिबट हल्ल्यांपासून रोखण्यासाठी सरकार आणि वन विभागाने तातडीने पावले उचलावीत. केंद्रीय आणि राज्य सरकारांनी वाढती प्रजनन दर कमी करण्यासाठी बिबट नसबंदी बाबत कायदा करावा.
लढा कसा लढतोय?
मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडणे. ईमेलद्वारे एकाच प्लॅटफॉर्मद्वारे समस्या संवाद साधणे. वन विभाग आणि महाराष्ट्र सरकारला तक्रारींद्वारे समस्येची गांभीर्य आणि तातडीची जाणीव करून देणे. त्या तक्रारींवर घेतलेल्या कारवाईंची माहिती मिळवणे. केंद्रीय आणि राज्य सरकारांनी प्रभावी उपाय न केल्याने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करणे. कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणि कठोर अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव आणणे.